🕒 1 min read
मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं बनावट नोटांचा खेळ सुरु होता, १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं. मात्र महाराष्ट्रातून खोट्या नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. ८ ऑक्टोबर २०१७ मध्ये इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये छापेमारी झाली. ज्यात १४ कोटी ५६ लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या. या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले, असा दावा मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण. https://t.co/faCdX2rcCn
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 10, 2021
तसेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं. हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, याच्या दुसऱ्या पत्नीवर खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयातून फोन गेला, असाही आरोप मलिकांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ४० एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतलेले बेशरम सरकार मोर्च्याला सामोरे जाईल का?
- एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, मात्र पोलिसांकडून अडवणूक
- ‘काल यांचे मंत्री दिसले नाही, एसटी कामगार विचारत होते’, नितेश राणेंचा टोला
- एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सदाभाऊ खोत यांचे अन्नत्याग आंदोलन
- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ‘या’ दिग्गज खेळाडूंना ठेवले संघाबाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
