Share

‘फडणवीस पुन्हा येणार होते आले नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका’; थोरातांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर, सुमारे २६ ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत आपल्या सविस्तर मागण्यांसंबंधी एक पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. यातून त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासह पूरस्थिती टाळण्यासाठी कायमच्या उपाययोजना याबाबत एकूण २६ मागण्या केल्या आहेत.

फडणवीसांच्या या मागण्यांवर आता राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात बोलताना फडणवीसांवर टीकास्त्र सोडलंय. ‘हे वर्ष नैसर्गिक संकटाचे राहिले आहे. कोकणात 2 चक्री वादळे आली, अतिवृष्टी झाली. कोल्हापूर, सांगलीत पूर आला. त्यानंतरही आम्ही जनजीवन सुरळीत केलं,’ असं थोरात म्हणाले.

तर, ‘नैसर्गिक संकटाचा फटका बसलेल्यांना मदत झाली पाहिजे हेच आमचं मत आहे. मात्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी किती कलमे लावली? त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ते येणार होते आले नाहीत,’ असा खोचक टोला देखील थोरात यांनी लगावलाय.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. ‘विरोधी पक्षाचं मागणी करणं हे काम आहे. ती त्यांची जबाबदारीच आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात ते त्यांनाही माहिती आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी करताना त्यांच्या अनेक बाबी लक्षात आल्या असतील. मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही. तर ती देताना अनेक अडचणी असतात. फक्त राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारनेही मदत करावी, अशी जनतेची मागणी आहे. आम्ही मदतीसाठी तयार आहोत. आम्ही ती करु सुद्धा,’ असं भाष्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!