Share

सीसीटीव्हीच्या निगराणीत असलेल्या स्थानकातून १७३ किलो ‘कॉपर’ची चोरी, औरंगाबाद रेल्वेस्थानकाची सुरक्षा ऐरणीवर!

Published On: 

औरंगाबाद : शहरातील अनेक भागांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सीसीटीव्हीच्या निगराणीत असलेल्या रेल्वे स्टेशनमध्येच चोरी सारख्या घटना घडायला लागल्या तर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. रेल्वे स्थानकावरील  ट्रान्स्फॉर्मरमधील (विद्युत रोहित्र) चक्क १७३ किलो कॉपर चोरट्यांनी पळविले आहे. याबाबत रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने चोरांचा शोध सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद होत्या. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी झाल्याने रेल्वे देखील रुळावर आल्या. त्यामुळे प्रवाशी संख्या देखील वाढली आहे.  त्यातच आता चोरांचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे.  रेल्वे स्थानकावर असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधील कॉपरच चक्क चोरट्यांनी पळविले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना २४ तारखेला मध्यरात्री १ ते ४ च्या दरम्यान घडली.  तेव्हापासून रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने चोरट्यांचा शोध घेतली जात आहे.

याचा तपास आरपीएफ पोलीस निरीक्षक अरविंद शर्मा आणि  पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ हे घेत आहेत. सेक्शन इंजिनिअर यांच्या ऑफिसजवळील ट्रान्सफॉर्मर मधील कॉपर नेमका चोरट्यांनी पळविला कसा? याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय चोरांचा देखील शोध घेतला जात आहे. आतापर्यंत दोन संशयीत वाहनधारकांना ताब्यात देखील घेऊन त्यांची चौकशी केली. मात्र अद्यापही चोरट्यांचा शोध लागलेला नाही. कॉपर चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. असेही रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!