🕒 1 min read
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नियुक्ती रखडल्याने स्वप्नील लोणकर याने काही दिवसांपूर्वी जीवन संपवले होते. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. यावरून विरोधकांनी रान पेटवले होते. भारतीय जनता पक्षाने एमपीएससीच्या रखडलेल्या प्रक्रियेवरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते.
यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ जुलै रोजी विधानसभेत एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केल्याचे पवार यांनी विधिमंडळात सांगितले.
परंतू आता ३१ जुलै तारीख उलटल्यानंतरही राज्य सरकारने एमपीएससीची रिक्त पदे भरण्याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर १५ ऑगस्ट पर्यंत MPSC च्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत व परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले नाही तर राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
‘एमपीएससी संदर्भात एकही शब्द महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पाळला गेला नाही. खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे. अजून किती स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या या सरकारला पाहिजे आहेत. कारण हे सरकार खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. परंतु आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही,’ असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
यासोबतच, ’15 ऑगस्ट पर्यंत MPSC च्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही व आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर 15 ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू,’ असा इशारा देखील खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सीसीटीव्हीच्या निगराणीत असलेल्या स्थानकातून १७३ किलो ‘कॉपर’ची चोरी, औरंगाबाद रेल्वेस्थानकाची सुरक्षा ऐरणीवर!
- पुण्यात सर्वच सेवांना वेळ वाढवून देण्यासह विकेंड लॉकडाऊनही हटवा; महापौरांची राज्य सरकारकडे मागणी
- ये भारत कि शान है… ; पी. व्ही. सिंधूने जिंकल कांस्यपदक !
- ‘विमा कंपन्यांवर कडक कारवाई करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- पुणे शहरात आज ३३३ रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
