🕒 1 min read
पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची घोषणा केली. यानुसार २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्यात आले. तर कोरोना स्थिती लक्षात घेता ११ जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता लेवल ३ चे निर्बंध कायम ठेवले आहेत. यासोबतच, गरज पडल्यास कोरोना नियंत्रणासाठी या ठिकाणी निर्बंध वाढवलेही जातील, असं टोपे यांनी सांगितलं. या ११ जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर नेते आणि व्यापारी यांनी केली आहे. दरम्यान, पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यवहार व दुकाने बंद ठेवून राज्य सरकार व प्रशासनाला सहकार्य केलं होतं. आता कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या कमी होऊन देखील निर्बंध का लागू ठेवले आहेत ? असा सवाल पुण्यातील व्यापारी महासंघाने केला आहे.
आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरात लागू असलेल्या निर्बंधांमध्ये सूट देण्यास राज्य सरकारने मान्यता द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यानुसार ४ वाजतेपर्यंत असलेली वेळेची मर्यादा संध्याकाळी ७ पर्यंत वाढवण्यासह विकेंड लॉकडाऊन रद्द करावा, त्यादिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वच सेवांना परवानगी द्यावी, अशी मागणी मोहोळ यांनी केली आहे.
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये मोहोळ म्हणतात, ‘पुणे शहरात सोमवार ते शुक्रवार सायं. ७ पर्यंत आणि विकेंडला सायं. ५ पर्यंत सर्वच सेवांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साप्ताहिक बैठकीत करत आलो आहे. त्यावर सकारात्मक प्रतिसाद येत असला तरी प्रत्यक्ष निर्णय घेतला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमची राज्य सरकारला विनंती आहे, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, म्हणजे याबाबतचे आदेश आम्हाला महापालिका स्तरावर पारित करता येतील आणि व्यापारी वर्गाला दिलासा मिळू शकेल.’
आमची राज्य सरकारला विनंती आहे, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, म्हणजे याबाबतचे आदेश आम्हाला महापालिका स्तरावर पारित करता येतील आणि व्यापारी वर्गाला दिलासा मिळू शकेल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 1, 2021
पुण्यातील व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा –
‘पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवारी दुपारी १२ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून सरकारनं ऐकलं नाही, तर बुधवारपासून दुपारी ४ नंतरही दुकानं सुरु ठेऊ, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाने दिला आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन केलं म्हणून व्यापाऱ्यांना जरी अटक केली, तरी आम्ही मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या फतेचंद रांका यांनी जाहीर केली आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी सरकारनं द्यावी, अन्यथा आम्ही ती उघडी ठेऊ, असं देखील महासंघातर्फे सांगण्यात आलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- सीसीटीव्हीच्या निगराणीत असलेल्या स्थानकातून १७३ किलो ‘कॉपर’ची चोरी, औरंगाबाद रेल्वेस्थानकाची सुरक्षा ऐरणीवर!
- ‘मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही; केंद्र सरकारनेही मदत करावी, अशी जनतेची मागणी’
- ये भारत कि शान है… ; पी. व्ही. सिंधूने जिंकल कांस्यपदक !
- ‘विमा कंपन्यांवर कडक कारवाई करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- पुणे शहरात आज ३३३ रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
