🕒 1 min read
मुंबई : ‘अमिताभ आणि अक्षय मनमोहन सिंह यांचे सरकार असताना ट्वीटरच्या माध्यमातून टीव टीव करायचे. इंधन दरवाढीवर टीका करायचे. आज ते का गप्प आहेत? केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणाविरुद्ध त्यांनीही भूमिका मांडावी. अन्यथा आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ’, अशी तंबी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली होती.
अमिताभ आणि अक्षय यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याने, त्यांच्या चित्रपटाचे शुटींग आणि त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला होता.
यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाटोलेंच्या भूमिकेवर जोरदार टीका केलेली होती. ‘नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून केवळ प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्यांनी घेतलेली ही भूमिका ही केवळ प्रसिद्धीसाठीच आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शुटींग आणि त्यांचे सिनेमे बंद पाडून नाना पटोले नेमके काय सिद्ध करणार आहेत? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.
दरम्यान, नाना पाटोले यांनी आज फडणवीस यांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. ‘सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे’, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस ( @Dev_Fadnavis ) अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे. pic.twitter.com/RpyzyB4WFN
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 19, 2021
‘एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का?… ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? ‘ असंही पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची डोळ्यांची भाषा अन् उद्धव ठाकरेंनी घेतली फिरकी
- चंद्रकांत दादा, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! हसन मुश्रीफांचा इशारा
- ‘उस्मानाबादसह औरंगाबादचे नामांतर करा, अन्यथा..’
- महिलांनो वेळीच सावध व्हा ! ‘डीपी’चं कौतुक करून जाळ्यात ओढणाऱ्या नराधमाला अटक
- ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

