🕒 1 min read
शिवनेरी : दरवर्षी शिवजन्मस्थळ शिवनेरीवर महाराष्ट्र सरकारतर्फे शासकीय शिवजयंती साजरी केली जाते. यासाठी खुद्द मुख्यमंत्री देखील या स्थळी दाखल होत असतात. कोरोनाचं सावट हे कायम असल्याने हा सोहळा साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला गेला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आदींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव व पालखीचा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमावेळी राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक कोट्या देखील रंगल्याच पाहायला मिळालं. आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात अजित दादांचं कौतुक करताना म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांना सात भाषा यायच्या. त्यापैकी एक भाषा म्हणजे डोळ्याने ते मावळ्यांना सांगायचे. त्यांची सांकेतिक खूण मावळ्यांना योग्य सूचित करायचे. आत्ता अशी भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार वापरतात. बेनकेंनी असं म्हणताच अजित दादांनी हात जोडले.
यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बेनकेंच्या विधानावरून चांगलीच फिरकी घेतली. ‘ आमदार अतुल बेनके म्हणाले दादांना डोळ्याने ओळखणारी भाषा येते. आता मला ती भाषा शिकावी लागणार आहे. का? तर मला दादाच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अगदी गॉगल घातलं तरी मी दादाच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार,’ अशी टिप्पणी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार?
- चंद्रकांत दादा, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! हसन मुश्रीफांचा इशारा
- ‘१ मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल’
- सरकार आपल्याच आमदारांना घाबरतंय ? फडणवीसांच्या टीकेवर अजितदादांचं रोखठोक उत्तर
- ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही’


