🕒 1 min read
शिवनेरी : सर्वत्र आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात. राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे.
दरवर्षी शिवजन्मस्थळ शिवनेरीवर महाराष्ट्र सरकारतर्फे शासकीय शिवजयंती साजरी केली जाते. यासाठी खुद्द मुख्यमंत्री देखील या स्थळी दाखल होत असतात. कोरोनाचं सावट हे कायम असल्याने हा सोहळा साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला गेला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आदींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव व पालखीचा सोहळा पार पडला.
या सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. तर, कोरोनाशी लढाई करताना मास्क हीच आपली ढाल आहे’ असं भाष्य केलं आहे. ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते’ असं ते म्हणाले.
तर, ‘शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका,’ असं देखील उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार?
- योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना औषधह बाजारात, लॉचिंगला केंद्रीय आरोग्यमंत्री आणि गडकरी
- रायगडावर विद्युत रोषणाईवर अजित पवार म्हणाले, हा उत्साही लोकांचा अजाणतेपणा !
- सरकार आपल्याच आमदारांना घाबरतंय ? फडणवीसांच्या टीकेवर अजितदादांचं रोखठोक उत्तर
- ‘काही साप चावतात, काही चावत नाहीत ; पण त्यांना ठेचायचं असतं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

