🕒 1 min read
पुणे : सोशल मीडियामुळे आपल्या नकळत अनेक वयक्तिक माहिती ही चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागत असते. यामुळे होणाऱ्या गैरप्रकारांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आर्थिक फसवणूक करणे, ओळख करून महिलांना आपल्या जाळ्यात ओढून अत्याचार करणे अशा घटना सर्रास घडत असल्याचं समोर येत असतात.
सोहळा मीडियाच्या ओढीमुळे आपण सहज एखादं कृत्य करतो पण ते किती महागात पडू शकत याची कल्पना आपण करू शकत नाही. सोशल मीडियाद्वारे महिलांना आपल्या जाळ्यात ओढून गैरफायदा घेणाऱ्या सोलापूरच्या एका नराधमास लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. सोशल मीडियावर महिलांनी फोटो शेअर केल्यास वा डीपी बदलल्यास हा नराधम त्यावर कमेंट करून कौतुक करायचा.
कौतूक केल्यानंतर चांगली ओळख प्रस्थापित करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार व लूटमार करणाऱ्या सोलापुरातील योगेश पाटील उर्फ गणेश कारंडे या भामट्याला अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी करमाळा तालुक्यातील श्रीपूर येथून त्याला अटक केली आहे. त्याच्या घरात दहा हुन अधिक मोबाईल्स सापडले असून त्यात सधन घरातील महिलांचे फोन नंबर, फोटो व काही व्हिडीओ क्लिप आढळून आल्या आहेत.
यामुळे फक्त तोंड ओळख असलेला कोणत्याही व्यक्तीबरोबर व्हॉटस्अप, फेसबुक या सारखा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलताना वेळीच सावध होऊन काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सुशिक्षित महिला सहज अशा तागाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचं काही प्रकरणांच्या उलगडा झाल्याने स्पष्ट झालं आहे.
या ठगाने २६ जानेवारीला सासवड-हडपसर रस्त्यावर सोलापूर जिल्ह्यातील शिक्षिकेला रस्त्यात सोडून, तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम व मोबाईल फोन असा ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. साबणाधित शिक्षिकेला योगेशबाबत काहीच माहिती नव्हती. केवळ सोशल मीडियामधील ओळखीवरून शिक्षिका या ठगाबरोबर जेजुरीला फिरण्यासाठी गेल्या होत्या. गणेश कारंडे याने शिक्षिकेकडील दागदागिने व रोख रक्कम घेऊन जातांना, त्यांना रस्त्यातच सोडून दिले होते.
इतर प्रकरणांबाबत देखील त्याने पोलिसांना कबुली दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी याबाबत माहिती दिली आहे. महानोर म्हणाले, ‘गणेश कारंडे उर्फ योगेश पाटील याच्या घराची झडती घेतल्यानंतर 10 हून अधिक मोबाईल फोन सापडले. त्यात मोबाईल कंपन्यांची 20हून अधिक मोबाईल कार्ड मिळाली आहेत. यात अनेक महिलांचे मोबाईल नंबर व काही फोटोही आढळून आले आहेत. गणेश कारंडे हा सधन घरातील महिलांच्या बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तसेच लैंगिक अत्याचारानंतर कारंडे संबधित महिलांचे दागदागिने, मोबाईल व महिलांच्याकडे असलेली रोख रक्कम घेऊन फरार होत होता. त्याने अनेक महिलांना फसवले असण्याची शक्यता असून पीडित महिलांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलिसांमार्फत करण्यात आलं आहे. याबाबत सकाळ ने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची डोळ्यांची भाषा अन् उद्धव ठाकरेंनी घेतली फिरकी
- चंद्रकांत दादा, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! हसन मुश्रीफांचा इशारा
- ‘लेकीला लग्नाच्या घरातूनच शुभेच्छा द्या’, जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत समारंभ रद्द
- #shweta : चावट गप्पा मारणारी श्वेता आहे तरी कोण ? सोशल मीडियावर नेटिझन्सचा धुमाकूळ
- ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

