Share

दिपाली सय्यद यांनी पुण्यातून विधानसभा लढवण्याची व्यक्त केली इच्छा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अतिवृष्टीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना महापूर आला होता. या महापुराळे दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अनेक पूरग्रस्त अजूनही मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी, सेवाभावी संस्थांनी – मंडळांनी या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. तर अनेक सिने कलाकार देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले होते. आता सिने अभिनेत्री दिपाली सय्यद हीने अनोखी मदत करण्याचा विडा उचलला आहे.

पूरग्रस्त भागातल्या 1 हजार मुली दिपाली सय्यद यांनी दत्तक घेतल्या आहेत. त्यातल्या 50 मुलींची पुढच्या २ महिन्यात लग्न लावणार असल्याचं त्यांनी सांगितल आहे. तसेच या सामाजिक कार्याबरोबरचं दिपाली सय्यद यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर सय्यद यांनी राजकीय पक्षाच्या यात्रांवर टोलेबाजी केली आहे.कोणी कोणती यात्रा काढली हे महत्वाच नाही लोकांचे प्रश्न यात्रातून समजून घेतलं आणि सोडले तर यात्रा महत्वाच्या अन्यथा काही उपयोग नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान दिपाली सय्यद या अभिनेत्री असल्या तरी त्या २०१४ पासून प्रत्यक्ष राजकारणात आहेत. त्यांनी २०१४ला आम आदमी पार्टीकडून उमेदवारी मिळवत अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून  लोकसभा निवडणुक लढवली होती. तसेच मध्यंतरी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!