Share

MNS to Uddhav Thackeray | “बाप-लेक आणि विश्व प्रवक्ते यांनी…” ; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला

Published On: 

MNS to Uddhav Thackeray नवी दिल्ली : काल (सोमवार) शिवसेनेचे १२ खासदार फुटल्याची चर्चा होती. या खासदारांसह एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटणार आहेत. तर उद्धव ठाकरे रोज बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करत आहेत. यावर मनसेने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे.

“बाप-लेक आणि विश्व प्रवक्ते यांनी फक्त पदावर राहून बाकी सगळ्यांची एकच पत्र काढून एकदाच काय ती हकालपट्टी का करत नाही? ते रोज-रोज पत्र काढण्याचा त्रास तेवढा वाचेल. रोज सकाळी उठल्यावर याची हकालपट्टी, त्याची हकालपट्टी यातून जनताही मोकळी होईल,” असे ट्वीट मनसे नेते गजानन काळे यांनी केले आहे.

एकनाथ शिंदेंचा मोठा दावा-

पावसाळी अधिवेशनासाठी सर्व खासदार दिल्लीत आहेत. ही संधी साधत एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे आता संपूर्ण पक्ष हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत त्यांनी पहिल्यांदा महत्वाचे विधान केले आहे.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. “शिवसेनेचे खासदार आमच्यासोबत येतील. आमच्यासोबत १२ नाही तर एकूण १८ खासदार आहेत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका मानला जात आहे.

शिंदे गटाने शिवसेनेच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची केली स्थापना-

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. शिंदे गटाने शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी स्थापन केली आहे. या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या नोटीसवर सर्वोच्च न्यायालयात २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटात सामील झाल्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवण्याची आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. त्याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत या आमदारांवरील कारवाईला स्थगिती दिली होती. आता यावर सुनावणी होण्यापूर्वीच शिंदे गटाने उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!