मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत टीम इंडियाने सुधारणा केली आहे. भारताने इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका जिंकून या यादीत तिसरे स्थान मजबूत केले आहे. ऋषभ पंतचे वनडे क्रिकेटमधील पहिले शतक आणि हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. भारताने ही एकदिवसीय मालिका२-१ अशी जिंकली. भारताचे १०९ रेटिंग गुण आहेत. सध्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानपेक्षा (१०६ गुण) तीन गुणांनी जास्त आहेत.
या यादीत न्यूझीलंड १२८ गुणांसह अव्वल तर १२१ गुणांसह इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला आपले स्थान सुधारण्याची संधी असेल. हा संघ पाकिस्तानपेक्षा सात गुणांनी मागे आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या मालिकेतील विजय मिळविल्यास चौथ्या स्थानावर जाईल. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ आपली स्थिती मजबूत करू शकतो.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज दौरा २२ जुलैपासून
टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा २२ जुलैपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात कॅरेबियन संघासोबत ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
भारत vs वेस्टइंडीज वनडे वेळापत्रक
२२ जुलै – पोर्ट ऑफ स्पेन
२४ जुलै- पोर्ट-ऑफ-स्पेन
२७ जुलै – पोर्ट-ऑफ स्पेन
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
भारत : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल , आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन , रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.
महत्वाच्या बातम्या :
- Rishabh Pant : ऋषभ पंतने शॉट खेळण्यासाठी योग्य गोलंदाज निवडले; भारताच्या माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य
- Ben Stokes : ‘या’ कारणामुळे घेतली बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला,‘मी माझे शंभर टक्के…’
- Monkeypox case | देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण; आरोग्य सेवा सतर्क
- Sanjay Raut : लोकसभेत गट निर्माण केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल; संजय राऊतांचा खासदारांना इशारा
- Sanjay Raut : फुटीर गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतात?; संजय राऊत आक्रमक

