Share

Eknath Shinde | शिवसेना हायजॅक? “आमच्यासोबत १२ खासदार नाही तर एकूण…” ; एकनाथ शिंदेंचा दावा

Published On: 

नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री उशीरा दिल्लीला पोहचले आहेत. दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप हायकमांडशी चर्चा करू शकतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा असेल. राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यापूर्वी सोमवारी शिवसेनेचे १२ खासदार फुटल्याची चर्चा होती. पावसाळी अधिवेशनासाठी सर्व खासदार दिल्लीत आहेत. ही संधी साधत एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे आता संपूर्ण पक्ष हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत त्यांनी पहिल्यांदा महत्वाचे विधान केले आहे.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. “शिवसेनेचे खासदार आमच्यासोबत येतील. आमच्यासोबत १२ नाही तर एकूण १८ खासदार आहेत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका मानला जात आहे.

यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपच्या सहाय्याने सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेनी स्थानिक पातळीवर देखील शिवसेना पक्ष कमकुवत केला आहे. पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. दरम्यान आता खासदार ताब्यात घेतल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

शिंदे गटाने शिवसेनेच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची केली स्थापना

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. शिंदे गटाने शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी स्थापन केली आहे. या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या नोटीसवर सर्वोच्च न्यायालयात २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटात सामील झाल्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवण्याची आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. त्याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत या आमदारांवरील कारवाईला स्थगिती दिली होती. आता यावर सुनावणी होण्यापूर्वीच शिंदे गटाने उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!