Share

Monkeypox case | देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण; आरोग्य सेवा सतर्क

Published On: 

🕒 1 min read

केरळ: केरळ राज्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, दुबईहून गेल्या आठवड्यात आलेल्या 31 वर्षीय व्यक्तीच्या तपासणीत मंकीपॉक्स आजाराचा विषाणू आढळून आला आहे. ही देशातील मंकीपॉक्सची ही दुसरीच घटना आहे. पहिला रुग्ण देखील केरळमध्येच आढळून आला होता. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांची सखोल तपासणी केली जात आहे.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, १३ जुलैला केरळमध्ये पोहोचलेला रुग्ण कन्नूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर ‘परियाराम मेडिकल कॉलेज’मध्ये उपचार सुरू आहेत. या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांची तपासणी केली जात आहे. तर आता केरळमध्ये मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून तिरुअनंतपुरम, कोची, कोझिकोड आणि कन्नूर या विमानतळांवर हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत.

मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अनेक प्रकारची लक्षणे आधीच दिसू लागतात. जसे की डोकेदुखी, ताप, अंगदुखी, पाठदुखी, थंडी वाजून येणे, थकवा जाणवणे, चेहऱ्यावर व तोंडाच्या आत फोड येणे, हात व पायांवर पुरळ येणे. सध्या केरळमध्ये सापडलेल्या दोन्ही रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ‘अंडर ऑबजर्वेशन’मध्ये ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!