🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – जम्मू कश्मीरमध्ये हाय अलर्ट केला होता. काही वेळा पूर्वी दहशतवाद्यांची गाडी दिसली होती. आता जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा मोठा स्फोट होऊन, एक अधिकारी शहीद झाला असल्याची व एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
The Major-rank army officer was killed while defusing an Improvised Explosive Device (IED) which had been planted by terrorists. The officer is from the Corps of Engineers. The IED was planted 1.5 kms inside the Line of Control in the Naushera sector, Rajouri district, in J&K https://t.co/ZyWFS9RbWR
— ANI (@ANI) February 16, 2019
नौशेरा सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर जवानांकडून तपासणी सुरु होती. त्यावेळी हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर आयईडी ठेवले होते. ते निकामी करत असताना हा स्फोट होऊन एक अधिकारी शहीद झाला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सगळीकडे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.


