Share

ओबीसी समाजाला फसवणाऱ्या वडेट्टीवारांची हकालपट्टी करा; चित्रा वाघ यांची मागणी

Published On: 

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. हा निर्णय सर्व ओबीसींसाठी धक्कादायक आहे. यातच आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात 19 जुलै रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते घेत असताना आता निवडणुका लागल्याने हा मुद्दा पेटणार असल्याचे चिन्ह आहे. भाजपमधील ओबीसी नेत्यांनी देखील या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून राज्यसरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठीच 26 जूनला राज्यभर भाजपचे चक्काजाम आंदोलन आहे. दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दि. २३ जून रोजी आपल्या रत्नगिरी दौऱ्यात केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आणि ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. या शासनाने जनहिताचे एकही काम केलेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर बोलतच नाहीत व बोलणारे मंत्री विजय वडेट्टीवार फसवणूक करत आहेत. दररोज विधाने बदलत आहेत त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केला असून फसवे, कामचुकार मंत्री वडेट्टीवार यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात देखील केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!