Share

योगींना बळ देण्यास आठवले सज्ज; जे पी नड्डा यांची भेट घेऊन दिला युतीचा प्रस्ताव

Published On: 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष आतापासूनच कामाला लागले आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला युतीची साद घातली आहे.

उत्तर प्रदेशात रिपाईचे संघटन चांगले आहे. त्यामुळे मायावतींच्या बहुजन समाज पक्षाकडे (बसपा) गेलेला दलित मतदारवर्ग भाजपकडे वळवता येईल, असं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. दरम्यान, येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर, या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असून या पार्श्वभूमीवर आज रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आणि रिपाइं चे उत्तर प्रदेश प्रभारी जवाहर उपस्थित होते.

आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश महत्वाचे राज्य आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाला शह द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टी ने रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन युती केली पाहिजे. उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे संघटन चांगले आहे.उत्तर प्रदेशात मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने अपक्याकडे वळविला आहे. मात्र आता बहुजन समाज पक्षाकडे गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे घ्यायचा आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आरपीआयला भाजपने सोबत घ्यावे, असा प्रस्तावच आठवले यांनी भाजपला दिला आहे.

यासोबतच, भाजप आरपीआयची युती करावी तसेच अन्य राज्यांमध्ये आरपीआयचे युनिट मजबूत आहे. अन्य राज्यांमध्ये काही जागा भाजपने आरपीआयला देऊन युती करावी. भाजप हा आरपीआयचा पार्टनर आहे. भाजपसोबत राष्ट्रीय पातळीवर आरपीआयची युती मजबूत आहे. मात्र प्रदेश स्तरावर विधानसभा निवडणुकीत आरपीआयला जागा देऊन युती करावी याबाबत रामदास आठवले यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!