Share

बिहारमध्ये सत्तांतर हाेण्याचे संकेत; एक्झिट पोल भाजप आणि नितीशकुमार यांची चिंता वाढविणारे

Published On: 

नवी दिल्ली – काल बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर होत आहेत.या एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे बिहारच्या जनतेने सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक भाजपच्या नेतृत्वातील एनडीएसाठी प्रतिष्ठेची बनली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिहारमध्ये तब्बल १२ प्रचारसभा घेतल्या. परंतु बिहारी मतदार यावेळी मोदींच्या कोणत्याही आश्वासने आणि घोषणांना भुलले नसल्याचेच एक्झिट पोलच्या निष्कर्षांवरून स्पष्ट होत आहे.

२४३ जागांची ही विधानसभा आहे. यामधील १२२ जागा मिळाल्या तर बहुमत मिळेल आणि हे बहुमत मिळवणे तेजस्वी यादव यांच्या पक्षाला शक्य आहे अशी शक्यता आहे. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला १२० च्या वर जागा दाखवल्या आहेत.

एक्झिट पाेल एनडीए महाआघाडी एलजेपी इतर
एबीपी-सी व्हाेटर १०४-१२८, १०८-१३१, ०१-०३, ०४-०८
टीव्ही९ भारतवर्ष ११५, १२०, ०१, ०६
टाईम्स नाऊ-सी व्हाेटर ११६, १२०, ०१, ०६
रिपिब्लक-जन की बात ९१-११७, ११८-१३८, ०५-०८, ०३-०६
टुडेज चाणक्य ४४-५६, १६९-१९१
पाेल ऑफ पाेल्स ११०, १२४, ०४, ०५

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!