Share

खळबळजनक! डोळ्यात मिरची पूड टाकून जावयाने केला सासूचा खून

Published On: 

बीड: भेटायला आलेल्या सासूच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने वार करून जावयाने सासूचा निर्घुण खून केल्याची घटना रविवारी केज-कळंब महामार्गावर एका हॉटेल जवळ घडली असून, जावाई सासुनेच आणलेल्या दुचाकीवरून फरार झाला आहे. या थरारक घटनेमुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.या मारहाणीत सासूसोबत आलेला पुतण्या जखमी झाला असून जखमी पुतण्यावर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सासूबाई या पुतण्याच्या दुचाकीवर आल्या होत्या. हल्ला करून जावयाने सासुबाईने आणलेल्या दुचाकीवरून तेथून फरार झाला आहे.

साळेगाव येथील अमोल इंगळे याची पत्नी २ महिन्यापूर्वी प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. तर रविवारी सकाळी अमोल याची सासू लोचना उर्फ सुलोचना माणिक धायगुडे ( ४०, रा. धायगुडा पिंपळा ता. अंबाजोगाई) या पुतण्या अंकुश दिलीप धायगुडेसह दुचाकीने जावई अमोल इंगळे यास भेटण्यासाठी साळेगाव येथे आले होते. मात्र जावई अमोल याची भेट न झाल्याने ते दुपारी १२ वाजता परत गावाकडे निघाले होते.

केज-कळंब रस्त्यावरील साळेगावजवळील दिलीप मेडकर यांच्या हॉटेलसमोर अमोल इंगळे त्यांना भेटला. त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. त्यानंतर अंकुश धायगुडे यांच्या दुचाकीवर बसून लोचना अंबाजोगाईकडे जाण्यास निघाल्या. त्याचवेळी अमोलने त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून कोयत्याने दोघांवर वार करायला सुरुवात केली. या झटापटीत लोचना धायगुडे या दुचाकीवरून खाली पडल्या. अमोल इंगळे याने सासू लोचना यांच्या मानेवर व गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले. हे वार चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डाव्या हातावरही चार-पाच खोलवर वार झाले. यात लोचना धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्याव्सोबत आलेला पुतण्या अंकुश धायगुडे जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु आहेत.

केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरु केला आहे. तपासा दरम्यान जावया सोबत आणखी एक जण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सासू लोचना यांचा खून करून अमोल इंगळेने धायगुडेंनी आणलेल्या दुचाकीवरून पलायन केले होते, ही दुचाकी सोनीजवळा येथे सायंकाळी सापडली. खुनावेळी अमोलसोबत आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती जखमी अंकुश धायगुडे याने पोलिसांना दिली आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!