Share

पेट्रोल डिझेलच्या किमतींवरून ओवेसींची नरेंद्र मोदींवर टीका ; म्हणाले…

Published On: 

नवी दिल्ली : सध्या देशभरात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका झाल्या आहेत. तर उत्तरप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा एक टप्पा अजून बाकी आहे. उत्तरप्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यातील विधानसभा निवडणूक उद्या ७ मार्च रोजी होणार आहे. तर या वर उल्लेख केलेल्या पाचही राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल १० मार्च रोजी लागणार आहेत.

या शेवटच्या टप्प्याच्या निवडणूकीकरता प्रचार करताना हैद्राबादचे लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आज उत्तरप्रदेशमध्ये प्रचार सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले कि, ‘ ७ मार्चला शेवटच्या टप्य्यातील निवडणूक झाल्यावर किंवा १० मार्च रोजी निवडणुकांचे निकाल लागल्यावर मोदी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्यावर भारतीय जनता पक्षाचे भक्त गण आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे कारण पुढे करतील ; कारण भाजप आणि मोदींचे भक्तगण मोठ मोठ्या थापा मारण्यात पटाईत आहेत’.

काहीच दिवसांपूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पण रशिया युक्रेनमधील युद्धामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात याची शक्यता वर्तविली होती. यावरून सुद्धा असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘भारत सरकारमधील मंत्र्यांना आधीपासूनच माहिती आहे कि येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या जाणार आहेत; मात्र ते सर्व जण निवडणुकांमुळे गप्प आहेत’ अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी राजनाथ सिंह यांच्यावर केली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!