मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी रोज नवीन घडामोडी समोर येत असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
त्यांनतर सचिन वाझेंच्या नियुक्तीवरून आरोप करत भाजपने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, वाझेंच्या नियुक्तीवरून व काही गंभीर चुकांमुळे पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले. यामुळे परमबीर सिंह हे नाराज झाले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून मोठा गौप्यस्फोट केल्या आहे. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिन्याभरात १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट द्यायचे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे राज्यासह देशाचे राजकारण देखील तापले आहे. या प्रकरणासंदर्भात भाजपने सुरुवातीपासून महाविकास आघाडी सरकारला घेरलं होतं. तर आता यामध्ये इतर अधिकाऱ्यांकडून देखील नवनवीन गौप्यस्फोट केले जात आहेत. मात्र हे सर्व विरोधी पक्षाने महाराष्ट्रातील सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले आणि अस्तनीतील हे निखारे राज्य सरकारने पदरी बाळगले होते. अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
‘श्री. शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या पत्रातील फोलपणा समोर आणला आहे. गृहमंत्र्यांनी ज्या दिवशी वसुलीचे आदेश दिले, त्या काळात अनिल देशमुख इस्पितळात होते व इस्पितळातून बाहेर पडल्यावर त्यांनी आवारातच पत्रकार परिषद घेतली. गृहमंत्र्यांनी या काळात कोठे काय केले याची जंत्री विरोधी पक्ष देत सुटला आहे. म्हणजे विरोधी पक्षावर सरकारची नजर नसून विरोधी पक्ष पेंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारवर पाळत ठेवत आहे व हे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्रातील भाजप खासदारांना कायद्याची थोडी जरी चाड असेल तर त्यांनी पेंद्र सरकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर आवाज उठवायला हवा. दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करा असा दबाव राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्यावर टाकला, असा कांगावा परमबीर सिंग करीत आहेत.
हा दबाव नसून सूचना असाव्यात व त्यात गृहमंत्र्यांचे काही चुकले असे वाटत नाही. पोलीस आयुक्तांना हे सांगावे लागले याचा अर्थ इतकाच की, केंद्राच्या आदेशावरून ते कोणाला तरी वाचवायचाच प्रयत्न करीत होते. मोहन डेलकरप्रकरणी जे पत्र लिहिले आहे तो पुरावाच मानला जातो. त्यास मृत्यूपूर्व जबानी म्हटले जाते व त्यास कायदेशीर आधार आहे म्हणून कारवाई करा असे गृहमंत्र्यांना सांगावे लागले. पोलीस टाळाटाळ करीत होते हाच त्याचा अर्थ. परमबीर सिंग हे सर्व विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले व त्याबद्दल भाजप खासदारांना गुदगुल्या होत आहेत. या अस्वली गुदगुल्या असून हे प्रकरण भविष्यात भाजपवरच उलटल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

