Share

“उत्पल पर्रीकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास आमचा पाठींबा”,संजय राऊतांचा मोठा दावा

Published On: 

मुंबई: गोवा विधानसभा (Goa Assembly elections) निवडणुकींसाठी भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात पणजीमधून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मात्र उत्पल पर्रिकरांना ( Utpal Parrikar ) भाजपने अन्य दोन जागांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच उत्पल पर्रीकरांनी मी पणजीवरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान उत्पल पर्रीकर यांनी “मी पणजीवरच ठाम आहे. अन्य पर्यायांना काही अर्थच नाही. माझी भूमिका लवकरच माध्यमांसमोर मांडेल’, असे म्हटले आहे. त्यामुळे आता ते अपक्ष लढणार असल्याचेही म्हटले जात आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. गोवा विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हे उत्पल पर्रीकर यांच्यावर अवलंबून आहे. गोव्यात भाजपच्या स्थापनेत त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. असे संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता उत्पल पर्रीकर शिवसेनेची ऑफर स्वीकार करणार का, हे येणारा काळच ठरवेल.

दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत पणजीतून बाबूश मोन्सेरात निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच पर्रिकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिला आहे. असेही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!