Share

Aslam Sheikh | काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ, मढ मार्वे स्टुडिओ घोटाळाप्रकरणी नोटीस

Published On: 

मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या अडचणी वाढू शकतात. मुंबईतील मालाड येथील मढ-मार्वे परिसरात झालेल्या कथित व्यावसायिक फिल्म स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने त्यांना नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी पर्यावरण विभागाने मुंबई जिल्हा दंडाधिकारी आणि महापालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. किरीट सोमय्या यांच्या मते, मध-मार्वे स्टुडिओ हा 1000 कोटींहून अधिकचा घोटाळा आहे.

मुंबई महापालिकेकडून स्टुडिओ तोडण्याचे आदेश मिळतील, अशी अपेक्षा किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, “अस्लम शेखने 1 हजार कोटींहून अधिकचा घोटाळा केला आहे. त्यापैकी 300 कोटी कागदपत्रे उपलब्ध आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ तयार केला आहे. असे पाच स्टुडिओ तयार करण्यात आले आहेत. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून हे स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी तेथे भेट दिली. पेपरमध्ये हे स्टुडिओ समुद्रापासून दूर दाखवले आहेत. आदित्य ठाकरे यांनीही येथे भेट दिली आहे. जिथे 2019 मध्ये काहीच नव्हते तिथे 2021 मध्ये स्टुडिओ बांधले गेले. अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यात भागीदार आहेत. खारफुटी कापून हे स्टुडिओ तयार करण्यात आले आहेत.”

किरीट सोमय्या यांचा आरोप-

किरीट सोमय्या म्हणाले, “पर्यावरण विभागाने चित्रपटाचा सेट सहा महिन्यांसाठी तयार करण्यास परवानगी दिली होती. मात्र अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने येथे एक हजार कोटी रुपयांचा फिल्म स्टुडिओ तयार झाला. आदित्य ठाकरे यांनीही या जागेची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पर्यावरण आणि पर्यटन मंत्री होते. माझ्याकडे त्याची फोटो आहेत. योग्य वेळी दाखवेन. याप्रकरणी कोस्टल झोन प्राधिकरणाने त्यांना पत्र लिहिले आहे. यावर तातडीने कारवाई करावी.”

अस्लम शेख यांच्यावर 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप-

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अस्लम शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीला अस्लम शेख यांच्यासह भाजप नेते मोहित कंबोजही उपस्थित होते. त्याच गाडीत बसून दोघेही फडणवीस यांना भेटायला गेले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!