Share

Amit thackeray | “शिंदेंनी बंड केलं नसतं, तर दौरे केले असते का?”, अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना सवाल

Published On: 

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला धक्का दिला, त्यांनतर सुरु झालेले आरोप प्रत्यारोपांचे सामने अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. कधी महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप आणि मनसे, तर कधी मूळ शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे सामने रंगताना दिसून येत आहेत. दोन्ही सिनियर ठाकरे म्हणजेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकमेकांवर अनेक वेळा टीका टिपण्ण्या केल्याचं आपण पाहिलं आहे. पण आता असाच एक सामना ज्युनियर ठाकरेंमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी बंधू आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांच्या दौऱ्यांवरून आणि निष्ठायात्रेवरून टीका केली आहे. “माझा आदित्य ठाकरेंना फक्त एवढाच प्रश्न आहे, जर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर तुम्ही दौरे केले असते का?”, असं अमित ठाकरे म्हणाले.

आगामी निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्षाचे नेते हे दौरे आणि सभा घेत आहेत. यातच आता अमित ठाकरे ही आजपासून चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून एक प्रश्न विचारला. “मी माझे दौरे शिवसेनेत बंड होण्याआधीपासूनच सुरू केले आहेत. माझा आदित्य ठाकरेंना फक्त एवढाच प्रश्न आहे, जर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केलं नसतं तर तुम्ही दौरे केले असते, यात्रा काढल्या असत्या का?” पुढे त्यांनी लहान बंधू तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिली. “तेजस राजकारणात येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे”, असे ते म्हणाले.

असा असेल अमित यांचा दौरा 

अमित ठाकरे यांनी सध्या तरुण वर्गावर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यासाठीच त्यांच्या या चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यात ते विविध महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. तेथील विद्यार्थी सेनेशी थेट संवाद साधणार आहेत. ते ६ ऑगस्टला नाशिक तालुक्यातील महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. त्यानंतर ७ तारखेला मालेगाव, निफाड, येवला, चांदवड आणि नांदगाव या भागात भेटी देतील. तर ८ तारखेला कळवण, सटाणा, हरसूल, देवळा, सुरगाणा, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेतील आणि शेवटच्या दिवशी नाशिक शहरातील महाविद्यालयांना भेटी देणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!