Share

आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करीत आहे, फडणवीसांचा जोरदार टोला

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून वाचाळ अभिनेत्री कंगना राणावत हिच्या भोवती फिरताना दिसत आहे. कंगनाने आधी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला नंतर मुंबईची तुलना पाकव्यप्त काश्मीरशी केली आणि या सगळ्यांना भाजपने उघड पाठींबा दिला त्यामुळे कंगना ही अभिनेत्री आहे कि भाजपची प्रवक्ता असेही प्रश्न विचारले जाऊ लागले होते. अशात शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यातील वाद शिगेला पोहचले असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचले आहे.

मात्र, यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही. हे प्रकरण या सरकारने वाढविले. कंगना काही राष्ट्रीय नेत्या तर नाहीत. यांनीच तसे बनविले. सरकारने त्रस्त करणे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

तर, आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करीत आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची ? दुर्दशा झाली. राजासारखी मानसिकता सोडायला हवी. लोकशाहीत कोणी राजा असत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. असा घणाघात देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!