Share

धक्कादायक : पुणे संकटात असताना महापौर बंगल्यावर रंगली सर्वपक्षीय नेत्यांची जंगी पार्टी ?

Published On: 

पुणे : पुणे कोरोना महामारीच्या संकटात पुरते अडकले आहे. कोविड जम्बो सेंटरची अवस्था तर पुरती खालावली आहे. पुणेकर मरणाच्या दारात अडकले आहेत. मात्र पुण्यातील राजकीय मंडळींना याच काहीच सोयीरसुतक दिसत नाही. कारण महापौर बंगल्यावर बुधवारी रात्री सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांची एक जंगी पार्टी झाल्याचे वृत्त ‘पुढारी’ने दिले आहे. पुणेकर मरण यातना भोगत असताना राजकीय मंडळींची ही पार्टी नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याच कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

या पार्टीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांच्यासह काही नगरसेवकही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

यात धक्कादायक बाब म्हणजे दुपारी काँग्रेसने पालिका कर अभय योजनेवरून भाजपला कमालीचे धुतले होते, आणि रात्री झालेल्या कथित पार्टीचे नियोजन मात्र काँग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याकडून केल्याचे बोलले जात आहे.

आशात मोठ्या आवेशात आम्हीच पुणेकरांचे कैवारी सांगण्याऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांचा बुरखा टराटरा फाटला आहे. मुळातच पुण्यातील परिस्थिती गंभीर असताना अशी पार्टी करण्याची ही वेळ आहे का आणि याचे भान महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांना नाही का, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!