🕒 1 min read
अहमदनगर/ ऋषिकेश घोगरे:- राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम रस्त्याची नगर शहर व भिंगार परिसरामध्ये दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व बांधकाम विभागाकडे दोन वर्षांपासून पडून आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर व्हावा, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले आहे. आ.जगताप यांनी मुंबईत जाऊन खा.शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात आ.जगताप यांनी शरद पवार यांना निवेदन दिले आहे.
आ.जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर शहरातून जातो. परंतु हा रस्ता मागील काही दिवसांपासून अत्यंत खराब झाला आहे. ह्या रस्त्यावर अनेक खड्डे असून त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात याठिकाणी होत असतात. शहर हद्दीत रखडलेल्या रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामासाठी दोन वर्षांपूर्वी कल्याण रस्ता उड्डाणपूल ते सक्कर चौकापर्यंत चौपदरीकरण, दोन्ही बाजूंनी गटार, फूटपाथ, दुभाजक, पथदिवे व सीना नदीवरील पुलाच्या बांधकामाचा २८ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
परंतु त्या प्रस्तावावर केंद्र स्तरावर काहीही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी हा प्रस्ताव मंजूर होणे अतिशय आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांशी बोलून तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- आटीपीसीआर लॅब सुरू न झाल्यास आत्मक्लेश आंदोलन करणार या आमदारताई
- विखेंच्या शिर्डीत महसूलमंत्री थोरातांच्या संपर्क कार्यालयाचे लवकरच उद्घाटन
- शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून ‘या’ आमदारांनी गाठले थेट कृषीमंत्र्यांचे घर
- मागील २५ वर्षे काय केले? मुंबई तुंबली हे शिवसेनेचंच अपयश- राधाकृष्ण विखे
- अहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ७७८ नवे बाधित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
