Share

संजय राऊत कोणाकोणावर चालवणार बाण; पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Published On: 

मुंबई : आज पुन्हा संजय राऊतांची पत्रकार परिषद होणार आहे. राऊत जेव्हा जेव्हा पत्रकार परिषद घेतात तेव्हा ते विरोधकांवर शब्दांनीच हल्ले करतात. त्यामुळे आजही सर्वांचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे. आता त्यांच्या टार्गेटवर भाजप नेते तर आहेतच, पण त्याचबरोबर आता ईडीचे अधिकारीही आहेत. त्यांनी ईडीच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा फाडणार असा थेट इशारा आज होणाऱ्या पत्रकार परिषदेआधी दिलाय.

यावेळी राऊत म्हणाले कि, ईडी संदर्भात मी पंतप्रधान मोदी यांच्याकडे 13 पानी पत्र दिले आहे आणि तेही पुराव्यांसह दिले आहे. त्यामुळे अनेक पत्रकारांचा आग्रह आहे कि, ते पत्र मिडिया आणि देशासमोर ठेवा. त्यामुळे आज  ते पत्र मी देणार मिडियाला देणार आहे. त्या पत्रावरून तुम्हाला कळेल की केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरली आहे. या यंत्रणा कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात आणि राजकीय विरोधकांची कोंडी करून अडचणीत आणून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला हातभार लावतात.  हे सर्व टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग आहे तो मी बाहेर काढतो. असेही राऊत म्हणाले. त्यामुळे राऊत आज कोणते पुरावे देणार आणि त्या पात्रात काय लिहले असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

नवा ट्विस्ट?

केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करण्यात येतोय असा दावा करत संजय राऊत यांनी त्यांच्याकडील पुरावे पीएमओकडे दिल्याचं म्हटलं होतं. काही अधिकारी खंडणीचं रॅकेट वसुली एजंटातर्फे चालवत असल्याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसात राज्यात संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोप चालले आहेत. आता राऊतांनी ईडीवरही आरोप केलेत. त्यामुळे आता फोन टॅपिंग प्रकरणात नवा ट्विस्ट येणार का? हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!