पुणे : महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकटाने कल्लोळ माजवला आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावासाचा फटका रायगड आणि रत्नागिरीला बसला आहे. महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु आहे. गेल्या काही दिवसांत पावसामुळे तब्बल 129 नागरिकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सर्वांनी एकत्र येवून जनतेला या आस्मानी संकटांतून सोडवले पाहिजे. असे मत व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ रत्नागिरी दापोली जिल्यातील सर्व गाव पाण्याखाली गेले आहेत 2005 पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेले आहे. खूप मोठया प्रमाणात नागरिक हे या पाण्याखाली अडकले आहे.
अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये भाजपने कंबर कसली आहे. या पावसाचा आढावा व मदतकार्य करण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, निरंजन डावखरे कोकणात दाखल झाले आहे.तसेच कोयना धरणामधून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक राज्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे बोलणे देखील सुरु आहेत.’ अशी माहिती भंडारी यांनी यावेळी दिली आहे.
तसेच ‘ सरकारने या संकटाच्या काळात लोकांची मदत केली पाहिजे, वेळप्रसंगी हेलिकॉप्टरची मदत घेऊन नागरिकांचे जीव वाचवायला हवेत. तसेच कोणत्याही प्रकरचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन जनतेला या अस्मानी संकटांतून सोडवले पाहिजे.’ असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- दहावीनंतर आता प्रतिक्षा बारावीच्या निकालाची, औरंगाबाद विभागातील ४२ टक्के काम पूर्ण!
- पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात ; शिक्षणमंत्र्यांनी घेतला निर्णय
- राज्यात पावसाने घेतले आतापर्यंत १२९ जणांचे बळी ; आकडा वाढण्याची भीती


