मुंबई : राज्यातील सध्या कोरोन स्थिती पाहता आणि ऑनलाईन सुरु असणारं शिक्षण लक्षात घेत राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीसाठीच्या अभ्यासक्रमात कपात केली. पहिली ते 12 वी साठीचा अभ्यासक्रम कमी करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. गेल्यावर्षीही यामुळेच अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. देशातील कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचं ऑनलाईन शिक्षण सुरु केलं आहे, मात्र ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.#syllabus @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #COVID19 pic.twitter.com/Y90milYaUS
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 23, 2021
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन व शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. ‘सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतचा 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात पावसाने घेतले आतापर्यंत १२९ जणांचे बळी ; आकडा वाढण्याची भीती
- ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’
- ‘पूर परिस्थितीतही मुख्यमंत्री मातोश्रीवर आहेत, आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो’
- ‘वर्षभर घरी बसून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची व्याख्या बदललीच आहे की..’ भाजपचा टोला
- ‘काँग्रेसने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले’, काँग्रेसचा हल्लाबोल


