Share

तालिबानवर विश्वासासंबंधी बायडेन यांचे खोचक वक्तव्य, म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी एक पत्रकार परिषद घेतली. परिषदे दरम्यान,बायडन यांना तालिबान संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. यांपैकीच विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे अत्यंत खोचक पद्धतीचे उत्तर बायडेन यांनी दिले. १६ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर जगभरामध्ये यासंदर्भातील चर्चा आणि वृत्तांकन केले जात आहे. मागील आठवडाभरामध्ये अनेकदा बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून लष्कर मागे बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, आता बायडेन यांनी तालिबानवर विश्वास आहे की नाही याबद्दलही उत्तर दिले आहे.

पत्रकार परिषदे दरम्यान बायडेन यांना तुम्हाला तालिबानवर आता विश्वास आहे का? असे विचारण्यात आले असता त्यांनी अत्यंत खोचक शब्दांमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘मला कोणावरही विश्वास नाही, अगदी तुमच्यावर नाही. माझे तुमच्यावर प्रेम आहे पण मी फारश्या लोकांवर विश्वास ठेवत नाही. तसेच तालिबानने आता काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे,असेही ते म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,’आतापर्यंत कोणत्याही गटाने अफगाणिस्तानच्या लोकांचे चांगले व्हावे यासाठी प्रयत्न केले नाहीत. परंतु त्यांना तसे करायचे असल्यास बाहेरुन बरीच मदत लागेल. आर्थिक मदत, व्यापारासंदर्भातील मदत आता तालिबानला घ्यावी लागेल. तालिबानने दिलेला शब्द ते पाळतात की नाही हे आता बघायचे आहे. तसेच इतर देशांकडून त्यांना मान्यता मिळते की नाही याकडेही त्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. आतापर्यंत तालिबानने अमेरिकन लष्कराच्या तुकड्यांवर हल्ला केला नाहीय. त्यांनी आतापर्यंत अमेरिकेला तिथून लोकांची सुटका करण्यात अडथळे आणले नाहीयत. ते आता बोलतात त्याप्रमाणे वागतात का हे पुढील काळात समजेलच,’ असेही ते म्हणाले.

‘आपण आता अफगाणिस्तान सोडला नसता तर कधी सोडला असता? अजून दहा वर्षांनी, पाच वर्षांनी किंवा वर्षभराने. मी तुमच्या मुला-मुलींना अफगाणिस्तानमध्ये युद्ध करण्यासाठी पाठवू इच्छित नाही. हे आपल्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. तुम्ही बिजिंगमध्ये आणि मॉस्कोमध्ये बसून आम्ही अफगाणिस्तान सोडल्याने आनंदी असाल तर आम्हालाही या निर्णयाचा आनंदच वाटतोय’ असे बायडेन यांनी सांगितले.

दरम्यान, काबूलमधून लोकांना यशस्वीपणे बाहेर नेण्यात यश येत असले तरी अशा मोहिमांत काही प्रमाणात प्राणहानी देखील होऊ शकते. सुरुवातीच्या काही दिवसांतच काही लोक विमानाच्या पंख्याला लटकून खाली पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. या मोहिमांमध्ये जोखीम असते कारण प्रत्येकालाच सुरक्षित ठिकाणी परतण्याची घाई असते. असे असले तरी अमेरिका व मित्र देशांचे लोक तसेच अफगाणिस्तानचे काही नागरिक यांना सुरक्षितपणे माघारी आणण्यात आम्ही वचनबद्ध आहोत असेही बायडेन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!