Share

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी हक्काचे सभागृह असावे; सुनील शेळकेंची नवी संकल्पना

Published On: 

🕒 1 min read

वडगाव मावळ : महिला सक्षमीकरण व सबलीकरण गावच्या विकासाचे मुख्य द्योतक असून महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी हक्काचे सभागृह असावे, अशी नावीन्यपूर्ण संकल्पना आमदार सुनील शेळके यांनी ग्रामपंचायत आढावा बैठकीत मांडली.

मावळ तालुक्यामध्ये सुमारे शंभरपेक्षा जास्त ग्रामपंचायती असून ग्रामपंचायतीमध्ये महिलांना हक्काचे सभागृह उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. बचत गट, व्यक्तिमत्व विकास, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठीचे शिबिरे, प्रशिक्षण वर्ग, स्वसंरक्षणासाठी धडे, वैचारिक देवाण-घेवाण आदी गोष्टींसाठी महिलांना हक्काची जागा आवश्यक आहे, परंतु अद्याप कुठल्याच ग्रामपंचायतीत अशी व्यवस्था नाही. आमदार शेळके यांनी मांडलेल्या या संकल्पनेचे सर्वांनी स्वागत केले. आपल्या मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना हक्काचे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीची गावनिहाय आढावा बैठक सुरू असून आज शनिवार (दि.१३) रोजी साते, चिखलसे, साई, घोणशेत, टाकवे बुद्रुक, वडेश्वर, कुसवली, डाहुली, खांड, माळेगाव बु., इंगळुन, कशाळ, नवलाख उंब्रे, आंबी, माळवाडी या ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आमदार शेळके यांनी संवाद साधला.

महिला सक्षमीकरणाबरोबरच गावातील मूलभूत सुविधांचा विकास व्हावा. रस्ते, वीज, पाणी,स्वच्छता, कचऱ्याची समस्या आदी प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघावे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा व आपल्यावर विश्वास ठेवून निवडून दिलेल्या जनतेची सेवा करा.असे नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना शेळके यांनी सांगितले.

आज झालेल्या बैठकीमध्ये पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, गटविकास अधिकारी सुधीर भागवत व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!