🕒 1 min read
जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी साडेसहा वाजता या पत्रकारपरिषदेतून तनपुरे यांनी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून ओझन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर होतो. त्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करणार आहोत. तसेच आरोग्यासाठीच ते ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात कसे वापरता येईल, या दृष्टीने राज्य सरकारद्वारे सर्वार्थाने प्रयत्न सुरु केले असल्याचे देखील या वेळी तनपुरे म्हणाले. औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन वापरावर पुर्ण निर्बंध घालले आहेत. असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले. परभणीतील जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील ऑक्सिजन प्लांट्स उभारणीत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्या अडचणी दूर करण्याचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरु केले असल्याचे या वेळी तनपुरे यांनी सांगितले.
एका आठवड्यात तो प्लांट कार्यान्वित होईल व त्याद्वारे दररोज ३00 सिलेंडर उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून अंबेजोगाई तसेच परभणीत हे ऑक्सिजनचे दोन प्लांट वळवले आहेत. अंबेजोगाई येथील काम अंतिम टप्पयात आहे. एक दोन दिवसात तो प्लांट कार्यान्वित होणार असल्याचेही तनपुरे यांनी या वेळी सांगितले. परभणीतील प्लांटसाठी मोठ मोठे कॉम्प्रेसर लागणार आहे. ते वापरलेले असले तरीही कॉम्प्रेसर मिळावेत, या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मंत्री तनपुरे यांनी दिली आहे.
- कोरोना रोखण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी! हात जोडून पाया, पडून काही होणार नाही- खा.दानवे
- कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष रमेश शिंदे यांचे उपचारादरम्यान कोरोनामुळे निधन
- पुणे सावरतंय ! सलग सहाव्या दिवशी कोरोनामुक्तांची संख्या नव्या रुग्णांहून अधिक
- पिशोरला ५० बेडचे कोविड केअर कक्ष करण्यासाठी मदत करणार : आमदार दानवे
- ‘इथं पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही, पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढं केलंय का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

