Share

कोरोना रोखण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी! हात जोडून पाया, पडून काही होणार नाही- खा.दानवे

Published On: 

जालना: ‘महाराष्ट्राला  ३६ हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. मी राज्यातील जनतेसाठी केंद्राच्या पाय पडतो, हात जोडतो. आता तरी मदत करा, अशा शब्दात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला २ दिवसांपुर्वी साकडे घातले होते. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार असल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री तथा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी खरपूस समाचार घेत कोरोना रोखण्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका केली आहे.

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. केंद्राने २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्‍शन देणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून हा वाद सुरु झाला. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे. हे इंजेक्शन मिळावे म्हणून रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक अक्षरश: जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहेत. इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र शासनात राजकीय कलगीतुरा सुरू आहे.

राज्य सरकारवर आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका करतांना म्हणाले, स्वतःचे अपयश लपविण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणे हा एकमेव मार्ग राज्य सरकारने अवलंबला आहे. कोरोनाची दुसरी लाट येईल, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. मात्र, राज्य सरकारने कोणतीच उपाययोजना केली नाही. केंद्रानी सर्व राज्याला समान न्याय दिला आहे. मात्र राज्यातील सर्व मंत्री वेगवेगळे आरोप करत आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी आवरले पाहिजे, असेही दानवे यावेळी म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला मदत केली आहे असे असतांना सुद्धा केवळ आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट करत आहे, तसेच केंद्राने सर्व राज्यांना समान वागणूक दिली आहे. मात्र राज्यात कोरोना संसर्ग झापाट्यात वाढत असतांना भंडारा, नाशिक आणि विरार सारख्या घटनांकडून राज्यसरकारने काही बोध घेतला पाहिजे. तसेच अशा प्रकारची घटना भविष्यातही घडु शकतात. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे तर राज्य सरकारने ऑक्सिजनचे प्लांट उभारायला पाहिजे. मात्र हे कामं सोडून राज्य सरकार सध्या राजकारण करत आहे. मंत्र्याने हात पाय जोडून नाही तर प्रभावी उपाययोजना करायला हव्यात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!