🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे यांचे शनिवारी निधन झाले. कोरोनामुळे शिंदे हे खासगी रूग्णालयात आठवडाभरापासून दाखल होते. मृत्यूसमयी ते ५४ वर्षाचे होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुद्रित शोधक म्हणून ते कार्यरत होते. अभ्यासू तसेच संघर्षशील वृत्तीमुळे महाराष्ट्रभर त्यांनी विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चांगली ओळख निर्माण केली होती. रमेश शिदे हे महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने महासंघाच्या माध्यमातून प्रयत्नशील असायचे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी – अधिकारी संघटनेचेही ते सचिव होते. विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी सकाळ या दैनिकांत नाशिक आवृत्तीला मुद्रीतशोधक तसेच उपसंपादक म्हणूनही काही वर्षे सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली मुलगा असा परिवार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक वेळा खुप मोठा संघर्ष केलेला आहे. विद्यापीठ कायदे व सर्व शासनादेश यांची अभ्यासपूर्ण मांडणी ते करत होते. राज्यातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय! रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार
- केंद्र सरकार जबाबदारी झटकत असेल पण महाराष्ट्र सरकारने झटकू नये; काँग्रेसचा घरचा आहेर
- …अन् ‘त्या’ फोनमुळे नागपुरात ऑक्सिजनची मोठी मदत; फडणवीसांनी मानले आभार !
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- बुडत्याला काढीचा आधार; अखेर करमाळाकरांना ३० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होणार


