जालना: गेल्या महिन्यात २६ तारखेला रात्रीच्या वेळी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. मामाच्या गावात राहत असलेली अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी बाहेर पडली असता, आलेल्या दोन जणांनी त्या मुलीस दुचाकीवर मध्ये बसवून अपहरण केल्याची घटना अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथे घडली होती. या प्रकरणातील एका आरोपीला दोन दिवसांत पकडले होते. मात्र, दुसरा मुलीला घेऊन पसार झाला होता. दरम्यान, रविवारी रात्री चंदनझिरा भागातून मुलीसह त्या आरोपीला अंबड पोलिसांनी जेरबंद केले आहे.
लघुशंकेसाठी गेलेल्या मुलीचे अपहरण करीत असताना संशयित आरोपी शरीफ हबीब शेख, मोहंमद मुनीर पठाण (ताडहदगाव) या दोघांना पाहिले होते. मुलीला नेत असताना ग्रामस्थांनी आवाज देत पाठीमागे धावून थांबवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांजवळ काही वाहन नसल्यामुळे त्या मुलीस दुचाकीवर मध्ये बसवून नेत अपहरण केले होते.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात शरीफ हबीब शेख, मोहंमद मुनीर पठाण या दोघांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शरीफ हबीब शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, मोहंमद मुनीर पठाण हा मुलीला घेऊन अनेक दिवसांपासूनच फरारच होता. दरम्यान, जालना शहरातील चंदनझिरा भागातील त्या मुलीसह त्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या आरोपीला अंबड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. रात्रीच्या वेळी मुलीच्या केलेल्या अपहरणाच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज, सोशल मीडियावर व्हायरल
- मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला; ममता बॅनर्जींची टीका
- मोदींच्या भेटीपूर्वी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये झाली तासभर चर्चा
- …म्हणून ‘त्या’ सात बहिणींवर आली वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची दुर्दैवी वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

