भोसरी : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. हे आंदोलन बाहेरच्या देशाचे षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असेही दानवे म्हणाले.
आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे. या वक्तव्यांमुळे दानवे यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
दरम्यान, शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, उप शहरप्रमुख अनिल सोमवंशी, युवा सेना जिल्हाधिकारी सुरज लांडगे, सचिन सानप, समन्वयक अंकुश जगदाळे, दादा नरळे, सर्जेराव भोसले, विभाग प्रमुख सतीश दिसले, गणेश इंगवले, सतीश मरळ, शाखाप्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, बीडमध्ये देखील आंदोलन करत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा शिवसैनिकांनी समाचार घेत आपला संताप व्यक्त केला. यावेळी दानवेंचा फोटो असलेला बॅनर पायदळी तुडवत जाळण्यात आला केज, धारूर, अंबाजोगाई, परळी, माजलगावमध्ये जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत : वडेट्टीवार
- राहुल गांधींविरोधात रचलं जातंय मोठं षडयंत्र? जाणून घ्या नेमका काय आहे प्रकरण …
- पुण्यातील भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या राहत्या घरातून 18 लाखांच्या दागिन्यांची चोरी
- ‘कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार’
- ‘ठाकरे सरकार आल्या आल्या नाईट क्लबवाले त्यांच्या बापाचं सरकार असल्यासारखे वागू लागलेत’


