मुंबई : गेले ८ महिने राज्यासह देशात कोरोनाने कहर माजवला आहे. सद्या कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त असून हा रोग मुळासकट नष्ट व्हावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आज राज्यात कोरोनाचे नवे ४ हजार २६८ रुग्ण आढळले.
गेल्या काही दिवसांत नव्या रुग्णांचा आकडा ५ हजार पार गेला होता. मात्र, काल हा आकडा ४ हजारांखाली आला होता. आज त्यात किंचित वाढ झाली आहे. तर, दुसरीकडं कोरोनामुक्तांच्या आकड्यात मात्र लक्षणीय घट झाली आहे. २ हजार ७७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एकूण कोरोना रुग्णांचा आकडा १७ लाख ४९ हजार ९७३ इतका झाला आहे.
सद्या राज्यात ७३ हजार ३१५ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३. ४६ टक्के झाले आहे. आज दिवसभरात ८७ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
कोरोना लसीचा मुहूर्त ठरला?
पुढच्या थोड्याच दिवसांत, 2021 च्या आधीच भारतात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. CNBC ने दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह वृत्तानुसार, पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि फायझर या कंपन्यांनी लशीच्या वापराला परवानगी देण्यासंदर्भात DCGI कडे अर्ज केला आहे. तर, एबीपीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लशीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन म्हणजेच 25 डिसेंबरचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 22 ते 26 डिसेंबरदरम्यान या दोन्ही लशींना परवानगी मिळून देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.
राज्यात आज 4268 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2774 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1749973 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73315 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 11, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी कुटुंबाने काँग्रेस सोडावी, तर मोदी, शाह, नड्डा सेल्फमेड नेते’
- सरकारचा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत नवा ‘फतवा’
- “कुणीही येतंय चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा”; ममता बॅनर्जींची भाजपावर तुफानी टीका
- ‘त्या’ खासदारांचा काय अभ्यास? भुजबळांचा उदयनराजेंना अप्रत्यक्ष टोला
- अंबानी-अदानींचे टोल नाके बंद पाडणार; शेतकऱ्यांचा उद्यापासून हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

