🕒 1 min read
मुंबई : काँग्रेसच्या स्थापनेनंतर या पक्षावर गांधी घराण्याचं गेली अनेक दशके वर्चस्व राहिलं आहे. देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसमध्ये अनेकदा उभी फूट पडली तरी पक्ष अस्तित्व टिकवून उभा आहे. २०१४ पासून या पक्षाला उत्तरी कळा लागली असून राष्ट्रीय पातळीवर मोठे फेर बदल करण्याची गरज आहे.
तर, अनेक काँग्रेस नेत्यांची पक्षाचा अध्यक्षपदाची सूत्रे गांधी घराणं वगळता इतर नेत्यांकडे द्यावीत अशी मागणी जोर धरत आहे. मधल्या काळात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करणारे पात्र देखील काही नेत्यांनी लिहिले होते. आता काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
याला कारण म्हणजे विख्यात लेखक आणि क्रिकेट ते समाजकारण यावरील भाष्यकार आणि प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या एका लेखामध्ये गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी असं मत व्यक्त केलं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही, अशी भूमिका मंडळी आहे.
तर, मोदी, शाह आणि नड्डा हे भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेलं नाही. या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. दुसरीकडं, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे, असं परखड मत एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात व्यक्त केलं आहे. गांधींनी आता जाणं गरजेचे का आहे या मथळ्याखाली गुहा यांनी हा लेख लिहिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज
- सरकारचा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत नवा ‘फतवा’
- “कुणीही येतंय चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा”; ममता बॅनर्जींची भाजपावर तुफानी टीका
- ‘त्या’ खासदारांचा काय अभ्यास? भुजबळांचा उदयनराजेंना अप्रत्यक्ष टोला
- दाजीपूर अभयारण्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात 25 कोटी रुपये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

