Share

अंबानी-अदानींचे टोल नाके बंद पाडणार; शेतकऱ्यांचा उद्यापासून हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कृषी कायद्यांचा निषेध करत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज १६ वा दिवस आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे.

आता शेतकरी मजूर संघर्ष समितीच्या सदस्यांनी अमृतसरहून दिल्लीकडे कूच केलीय. सिंघु सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. जवळपास ७०० ट्रॅक्टर – ट्रॉली दिल्लीकडे निघाल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलंय.

या कायद्यांना विरोध करताना शेतकऱ्यांसह विरोधकांनी केवळ काही उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी हा घाट घातला जात असल्याची टीका केली होती. त्यामुळेच आता उद्या पासून शेतकरी अधिक आक्रमक पाऊल उचलणार आहेत. सरकारने दिलेला लेखी प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळला होता. सरकारने कृषी कायदेच मागे घ्यावेत, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. सरकार कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. हे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित न ठेवता देशव्यापी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याविषयी बोलताना भारतीय किसान युनियनचे नेते बलबीर एस. राजेवाल म्हणाले की, आम्ही उद्या (ता.12) दिल्ली-जयपूर महामार्गावर आंदोलन करुन तो रोखणार आहोत. यानंतर 14 डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, भाजप नेत्यांच्या घरांसमोर धरणे धरण्यात येईल. याचदिवशी शेतकरी अंबानींच्या रिलायन्स/अदानींच्या टोल नाक्यांवर आंदोलन करुन ते बंद पाडतील. मात्र, कुठेही रेल्वे रोखण्यात येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!