Share

सरकारचा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत नवा ‘फतवा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे निर्देश दिले आहेत. यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांनी कसा पोशाख घालावा यावर बंधन येणार आहे. जीन्स, टी-शर्ट घालण्यास सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. जीन्स, टी-शर्ट घालण्यास सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदी

तर, या निर्णयाचे मंत्रालय अधिकारी-कर्मचारी संघटनेने देखील स्वागत केलं आहे. दरम्यान, महिलांनी साडी, सलवार चुडीदार, पॅन्ट, ट्राउझर आवश्यकता असल्यास दुपट्टा घालावा. या पोशाखाचा नियमावली साठी खास मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार, गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करण्याचे टाळावे. आठवड्यातील एक दिवस शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावे. जीन्स आणि टी शर्ट घालू नये, असं बजावण्यात आलं आहे. नुकतंच शिर्डीतील साई संस्थांनने भक्तांना पोषाखाबाबत केलेलं आवाहन वादासाठी कारणीभूत ठरलं असतानाच राज्य सरकारने देखील सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये व कर्मचाऱ्यांना भान असावे यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे. साई मंदिरात प्रवेश करताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन साई संस्थानने केलं होतं. तसे फलक देखील मंदिर आवारात लावण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!