🕒 1 min read
मुंबई: देशभरात गाजलेल्या हिजाब वादावर आज (१५ मार्च) कर्नाटक न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नसून हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही. असे म्हणत शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. यावरच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
“सर्वांना आपला धार्मिक अधिकार आहे. मात्र शिक्षण संस्था या नियमांनी, कायद्यांनी चालल्या पाहिजे. शिक्षण संस्थामधील ड्रेस कोड सर्वांनी मानायलाच हवा. जर असे अनुशासन नाही ठेवले तर उद्या कुणी मिलिट्री मध्ये जाऊन म्हणेल की, मला मिलिट्री ड्रेस नको. कारण तो माझ्या धर्माचा नाही. त्यामुळे असे नाही होऊ शकत. नियम-कायदे आपल्या जागेवर आहेत. आणि धार्मिक स्वातंत्र्य आपल्या जागेवर आहे. त्यामुळे कर्नाटक न्यायालयाने एक स्पष्ट निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तरी हिजाबवर ‘controversy’ करणाऱ्यांनी चूप बसावे.”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
LIVE | Media interaction at Vidhan Bhavan, Mumbai#BudgetSession #Maharashtra #MaharashtraBudgetSession https://t.co/LGkJedGEuU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 15, 2022
दरम्यान कर्नाटकातील शाळेतील हिजाब बंदीवर कोर्टाकडूनही आता शिक्कामोर्तब झाले आहे. उडूपीच्या मुलींनी कोर्टात याचिका दाखल करून शाळेत हिजाब परिधान करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत विद्यार्थी शालेय गणवेश परिधान करून येण्यास नकार देऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: पंजाब किंग्जने वाढवली ताकद; ‘हा’ प्रशिक्षक बनवणार फलंदाजीची क्रमवारी घातक
- “लडेंगे और जितेंगे भी…“, दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
- अक्षयचा मराठमोळा अंदाज! सोलापुरातील मुलीशी मारल्या गप्पा
- शेतकऱ्याच्या मुलाच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार!
- रोहितने घेतली अंपायरची फिरकी; मजेशीर व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
