औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्ग गतीने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर लग्न समारंभांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र कडक बंदी असतांनाही शहरातील नजिकच्या खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे होत आहेत. यात सातआठशे लोकांचा जमाव जमवून लग्न सुरू आहेत. शहरातील नारेगावातही असाच प्रकार उघडकीस आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभ, मंगल कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश असतानाही नारेगावात एका मंगल कार्यालयात तब्बल ८० ते ९० जणांची लग्नासाठी गर्दी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार नारेगावातील गोल्डन हॉल येथे घडला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी धाव घेत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी सिडकोचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारेगावातील गोल्डन हॉल या मंगल कार्यालयात लग्नासाठी गर्दी झाल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन तात्काळ धाव घेतली असता, हॉलमध्ये लग्न समारंभासाठी व-हाडी जमले होते.
पोलीस हॉलमध्ये पोहोचले तोपर्यंत लग्न समारंभ आटोपला होता. दरम्यान, पोलिसांनी मंगल कार्यालयाचा मालक कासीम शेख, मंगल कार्यालय चालविणारे व्यवस्थापक फईम शेख, जफर शेख यांच्यासह नवरदेव इमरान पठाण, त्याचे वडील अन्सार पठाण तसेच नवरी शहेनाज शेख व तिचे वडील हारुण शेख अशा सात जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मनपाचे टार्गेट..१५ दिवसात ३ लाख औरंगाबादकरांना देणार कोरोना लस!
- सरकारचा जीव फक्त मुंबईत असेल तर आता मुंबईला जाणारी लाईन तोडू – पूजा मोरे
- सामाजिक समन्यायासाठी जिल्हा नियोजनाची गरज – डॉ. जे. एफ. पाटील
- जागतिक रंगभूमी दिन! शहर ‘लॉक’ अन नाटके ‘डाऊन’
- महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी फडणवीसांनी सरकारला दिला ‘हा’ मंत्र


