मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. मागील दहा दिवसांमधली जर पॉझिटिव्ह कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर पॉझिटिव्ह होणाऱ्या रूग्णसंख्येचा आलेख हा चढताच आहे.
राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी आहे.
कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातोय की काय अशी शंका व्यक्त केली जातेय. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनला विरोध करत कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे.
गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत.
असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा!
येणार्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!
(2/2)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2021
कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्यूला सांगितला आहे. फडणवीसांनी ट्विट करत ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ ही त्रिसूत्रीच कोरोनाला थोपवू शकते असं म्हटलंय. तसेच, चाचण्या वाढवणे हाच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. हे वारंवार सांगूनही न ऐकणार्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारचा जीव फक्त मुंबईत असेल तर आता मुंबईला जाणारी लाईन तोडू – पूजा मोरे
- सुखावह! औरंगाबादला मिळाला दहा हजार लसींचा साठा
- सामाजिक समन्यायासाठी जिल्हा नियोजनाची गरज – डॉ. जे. एफ. पाटील
- जागतिक रंगभूमी दिन! शहर ‘लॉक’ अन नाटके ‘डाऊन’
- एनआयएच्या चौकशीमुळे वाझेंचे बोलविते धनी चिंतेत ; फडणवीसांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

