Share

मनपाचे टार्गेट..१५ दिवसात ३ लाख औरंगाबादकरांना देणार कोरोना लस! 

Published On: 

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्ग गतीने वाढत आहे. त्यामुळे आता नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार ५ एप्रिलपासून मेगा कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. या मोहिमेसाठी शंभर पथके नियुक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दहा ते पंधरा दिवसांत तीन लाख शहरवासीयांचे लसीकरण करण्याचे टार्गेट प्रशासनाने समोर ठेवले आहे.

औरंगाबाद शहरात मागील पंधरा दिवसांत कोरोना संसर्गाने चांगलाच विळखा घातला आहे. संसर्गाची ही साखळी अशीच वाढत गेल्यास शहरात कोरोना रूग्णवाढीचा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या वाढत्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी पालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

मात्र या उपाययोजनांना देखील आता कमी पडताना दिसत आहे. याविषयी पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय उरला आहे. त्यामुळे ५ एप्रिलपासून मेगा लसीकरण मोहीम हाती घेण्याचे प्रशासनाने नियोजन आहे.

कोरोनाचा संसर्ग राहणारच आहे, त्याच्यासोबतच आपल्याला जगावे लागणार आहे. त्याच्या सोबत जगताना आपली रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहीजे आणि या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण देखील कमीत कमी झाले पाहीजे, यासाठी आता प्रत्येकाने लस घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे मेगा लसीकरणावर भर दिला जात आहे. या मोहिमेसाठी शंभर पथके तयार केली जात आहेत.

सरकारी टार्गेट केवळ २.१६ लाख डोसचे

राज्य सरकारने आता पालिकेला २ लाख १६ हजार व्यक्तींच्या लसीकरणाचे टार्गेट दिले आहे. मात्र तीन लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे पालिकेने ठरविले आहे. मेगा मोहिमेत दहा ते पंधरा दिवसात हे टार्गेट पूर्ण करण्याचे नियोजन केले जात आहे, असे आयुक्त पांडेय यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!