Share

‘तुम्ही आमदार-खासदार असलात तरी भोळे बनवू शकत नाही’, पवारांचा टोला नेमका कोणाला?

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उस्मानाबाद येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राजकारणातील परिस्थितीवरही भाष्य केले. ‘आज तुम्ही आमदार-खासदार असलात तरी लोकांना भोळे बनवू शकत नाहीत. लोकांना सर्व कळत असते’, अशा शब्दात पक्ष बदल करणाऱ्या नेत्यांना पवार यांनी टोला लगावला.

भाई उद्धवराव पाटील तत्वनिष्ठ होते. काहीही झाले तरी तत्व सोडायचे नाही, असे त्यांचे आचरण होते. आजच्या राजकारणात तत्व राहिलेले नाही. लोकांना विश्वासात न घेता आज या पक्षामध्ये तर उद्या दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचे प्रकार घडत आहेत. आपण ज्या विचारामुळे मोठे झालो, अशा विचारांना रामराम करतो. हे तत्वाला धरून नसते. व्यक्तिगत हितासाठी केलेले राजकारण टिकत नसते. आज तुम्ही आमदार-खासदार असलात तरी लोकांना भेाळे बनवू शकत नाहीत, लोकांना सर्व कळत असते, अशा शब्दात पक्ष बदलणाऱ्यांना पवार यांनी चिमटा काढला. भाई उध्दवराव पाटील यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त उस्मानाबादेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

तरुणांसमोर अनेक आव्हाने आहेत. ती ओळखण्याची कला आत्मसात केली पाहिजे. महाविद्यालयातील शिक्षण संपेपर्यंत आपण शिक्षण घेतलेल्या शाखेच्या नोकऱ्या संपलेल्या असतात. राजकारणात यायचे असेल तर लोकांना केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या व धार्मिक तणाव निर्माण न करणाऱ्या पक्षात काम करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तरुणाईला दिला.

पाकिस्तानच्या विरोधात बोलणे म्हणजे खरा राष्ट्रवाद नव्हे. देशात राहून सामान्यांच्या विचाराची तोडफोड करायची. शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत. असा राष्ट्रद्रोही विचार कामाचा नसल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!