मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. पहिल्या लाटेहून दुसऱ्या लाटेची तीव्रता ही अधिक होती. आता दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या देखील आटोक्यात येत आहे. मात्र, अशातच येत्या काही महिन्यांमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे राज्य सरकारने स्थानिक प्रशासनांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लाखो लोकांना जीव गमवावा लागला, तर सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या देखील या लाटेत नोंदवली गेली. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये याहून अधिक भयंकर स्थिती असेल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच तयारी केली आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.
‘कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका सज्ज आहे. अतिरिक्त जम्बो कोविड सेंटर उभे करण्यात आले आहेत. मुलांसाठी वेगवेगळे सुसज्ज सेंटर उभारण्यात आले आहेत. रुग्ण संख्या वाढू नये म्हणून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशीच उभी ठेवण्यात येईल,’ असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- महापोर्टल बंद करून नालायक ठाकरे सरकार विद्यार्थ्यांना विसरले, नीलेश राणेंची टीका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘…तर खांद्याला खांदा लावून काम करु’; नितेश राणेंच्या भाषणानंतर शिवसेना नेत्याने थोपटली पाठ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

