Share

‘आमचा दसरा कडवट झाला तरी तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही;’ ऊसाच्या एफआरपीसाठी राजू शेटी आक्रमक

Published On: 

कोल्हापूर : शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेटी आक्रमक झाले आहेत. राजू शेटी हे ७ ऑक्टोबरपासून ‘जागर एफआरपीचा’ हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली. आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा ईशाराही शेट्टींनी सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली.

राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत या आंदोलनाची माहिती दिली. येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. आराधना शक्तीस्थळापासून हे आंदोलन सुरु होणार आहे, असे शेट्टींनी सांगितले. महाराष्ट्रातील पूरस्थितीवरुनही त्यांनी राज्यसरकारवर टिका केली. केंद्र आणि राज्य सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचे कारस्थान रचले आहे. भाजपनेच एफआरपीचे तुकडे करण्याचे अनौरस बाळ जन्माला घातले आहे. आम्ही ते खपवून घेणार नाही. आज पुण्यात एक रकमी एफआरपीसाठी आंदोलन झाले, पुढच्या महिन्यात संपूर्ण राज्यात हे आंदोलन होईल, असे सांगतानाच ते म्हणाले, स्वाभीमानी कोरोना नियमांचे पालन करुन आंदोलन करते, स्वाभिमानी संघटना झोपली आहे, असा गैरसमज कुणीही करु नये असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना शेट्टी यांनी इथेनॉल निर्मितीच्या निर्णयाचे स्वागत केले. १५ सप्टेंबरपासून कारखाने सुरु करायला मंत्री समितीने परवानगी दिली आहे. राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेशिवाय पश्चिम महाराष्ट्रात कारखाने सुरु होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कधी नव्हे ते साखर उद्योगाला चांगले वातावरण निर्माण झाले आहे. ऊसाच्या रसापासून तयार होणाऱ्या ईथेनॉल निर्मितीचा निर्णय प्रोत्साहन देणारा आहे. आता कारखानदारांना कोणतीही ओरड करता येणार नाही, त्यांनी आता कोणतीही सबब सांगू नये, असेही राजू शेट्टी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!