🕒 1 min read
मुंबई: गेल्या वर्षभरापासून सीमेवर चीनच्या सुरु असलेल्या घुसखोरीच्या कारवायांमुळे देशाने अनेक वीरपुत्र गमावले तसेच चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे भारताचा काही भाग चीनच्या ताब्यात गेला आहे. मात्र यावर भारत सरकार कडून केवळ चीनची व्यापारी नाकेबंदी करण्यात आली. तर आता चीनने माघार घेतली असली तरी देखील दुसरीकडे पुन्हा चीनला व्यापारात झुकते माप दिले जात असल्याचे दिसत आहे. व्यापार मंत्रालयाच्याच तपशिलानेच यावर प्रकाश टाकल्याचा दैस्त आहे. यावरून वेळोवेळी सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
‘लडाख सीमेवरील हिंदुस्थान-चीन तणाव गेल्या आठवडय़ात निवळला. आता हिंदुस्थान-चीन व्यापारी संबंधांमधील तणावदेखील कमी होण्याची चिन्हे आहेत. चीनमधील सुमारे 45 कंपन्यांना हिंदुस्थानात व्यवसाय करण्याची मुभा दिली जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात, कोरोनाच्या उद्रेकानंतर चिनी कंपन्या, त्यांचा हिंदुस्थानातील व्यवसाय, गुंतवणूक यासंबंधी मोदी सरकारने घेतलेली ताठर भूमिका सैल होणार असे दिसत आहे. राजकारण काय किंवा परराष्ट्र संबंध काय, परिस्थितीनुसार बदलत असतात. त्यातील कठोरपणा वेळेनुसार कमी-जास्त होत असतो. मात्र तिकडे चीन सीमेवरील लष्करी तणाव कमी होणे आणि इकडे चिनी व्यापारासंबंधी कठोरपणा कमी होणे हा निव्वळ योगायोग मानायचा का?
‘चिनी वस्तूंवर बहिष्कार, स्वदेशीचा नारा, चिनी अॅप्सवर बंदी वगैरे फुगे राष्ट्रवादाची हवा भरून हवेत सोडले गेले, पण हिंदुस्थानी व्यापार मंत्रालयाच्याच तपशिलाने त्या फुग्यांना टाचणी लावली आहे. आता तर काही चिनी कंपन्यांनाही हिंदुस्थानात व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाण्याची चिन्हे आहेत. म्हणजे तिकडे सीमेवर चीन माघार घेतो आणि इकडे व्यापारात आपले सरकार त्याला ‘पुढे चाल’ देते. केंद्र सरकार ना हा ‘योगायोग’ मान्य करील, ना तिकडे ‘माघार’ आणि इकडे ‘पुढाकार’ या चालीचा खुलासा करील. अर्थात मांजर डोळे मिटून दूध पिते तरी जगाला ते दिसतेच. केंद्र सरकारने हे विसरू नये आणि चीनसारख्या धोकेबाज शेजाऱयाबाबत तरी ताकाला जाऊन भांडे लपवू नये, इतकेच !’ असा टोला आजच्या सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- ‘नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीचा रंग बदलणार नाही’, तेंडुलकरचे महत्त्वपुर्ण वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
