Share

मुख्यमंत्री येण्यापूर्वीच मनसे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

Published On: 

औरंगाबाद : आज शुक्रवारी (दि.५) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्याच्या एक दिवसआधीच गुरुवारी (दि.४ ) मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. तसेच नामांतराच्या विषयावरील पत्रके अंगावर फेकली. यावेळी ‘उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांची देखील गाडी अडवण्यात येईल’ असा इशारा दशरथे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.५) सकाळी सकाळीच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शहरात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध केले.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने औरंगाबाद येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाचा एक भाग म्हणून मनसेने क्रांती चौकात चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला.

यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रके खैरेंच्या अंगावर फेकली. तसेच शिवसेना मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहर अध्यक्ष सतनामसिंह गुलाटी यांना ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!